Kalapini : मराठी रंगभूमी दिनी विविध कलाविष्कारांद्वारे कलापिनीच्या कलाकारांची रंगभूमीला मानवंदना

एमपीसी न्यूज : मराठी रंगभूमी दिनानिमित्त तळेगाव दाभाडे (Kalapini) येथील कलापिनी या संस्थेत विविध कलाविष्कार सादर करण्यात आले. रंगदेवता आणि रंगभूमीसाठी 47 वर्षे अविरतपणे कार्य करणाऱ्या कलापिनित वेगळ्या विषयांवरील नाट्य आविष्कारांच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.

‘संगीत राजहंस या नाटकातील नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विनायक लिमये यांनी संवादिनीवर आणि अनिरुद्ध जोशी याने तबल्यावर साथसंगत केली. देवयानी लेले, मुग्धा जोर्वेकर, अरुंधती देशपांडे, दीपाली जोशी, मेधा रानडे, रवींद्र पांढरे, दीपक जयवंत, विराज सवाई, योगेश पन्हाळे यांनी नांदी सादर केली.

कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी स्वागत केले. सर्वांचा प्रतिसाद बघून नवीन उपक्रम हाती घेण्यासाठी खूप मनोबल मिळते असे त्या म्हणाल्या. विश्वस्त डॉ. अनंत परांजपे म्हणाले, “गुरुपौर्णिमा, विजयादशमी संकल्प दिन, रंगभूमी दिन आणि संस्थापक डॉ. शं. वा. परांजपे यांचा स्मृतिदिन अर्थात 24 नोव्हेंबर हेच ते साडेतीन मुहूर्त.”

प्रमुख पाहुणे राजेंद्र पाटणकर यांनी रंगभूमीदिन कधीपासून सुरु झाला, 180 वर्षांपासूनची मराठी नाटके, नाटकाचे विषय, लागणारा वेळ, श्रोत्यांचा ऐकण्याची आणि बघण्याचा दृष्टीकोन, समीक्षक, कलाकार या सर्वांमध्ये कसे कसे बदल होत गेले. हे सविस्तरपणे सांगितले. 1977 साली कै. शं. वा. परांजपे यांनी लावलेले कलापिनीचे हे छोटेसे रोप, त्याचा झालेला विराट वृक्ष आणि त्याच्या भारताबाहेर पसरत चाललेल्या शाखा, याचे राजेंद्र पाटणकर यांनी कौतुक केले.

डॉ. अरविंद लांडगे यांनी देणगी म्हणून काही रक्कम देऊ केली. वैशालीताई लिमये यांनी देखील अगदी उत्स्फूर्तपणे काही (Kalapini) रक्कम देणगीदाखल देऊ केली.

PCMC : महापालिका वल्लभनगर येथील ‘त्या’ कंपनीला देणार नोटीस

अनघा बुरसे यांनी सादर केलेले एका गृहिणीचे मनोगत मनाला भिडले. संदीप मनवरेचा पिंगळा प्रेक्षकातून एन्ट्री घेत आला आणि त्याच्या उद्बोधक सादरीकरणातून समाज प्रबोधन झाले. अरुंधती देशपांडे यांनी संगीत सौभद्र मधील ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे नाट्यगीत सादर केले. या नाट्यगीताने रसिकांना थेट संगीत नाटकांच्या जमान्यात नेले. सायली रौंधळ हिने ‘चार चौघी’ या नाटकातील प्रवेशातून रसिकांची मने जिंकली.

Pimpri : पिंपरीतील सिटी वन मॉल समोर भरधाव वाहनाला लागली आग

डॉ. विनया केसकर यांनी तुकोबांची आवली सादर केली. तिचे घर, मुले, तिचे आप्पाजी, तुकोबा डोळ्यापुढे उभे राहिले. या कार्यक्रमात शेवटी डॉ. अनंत परांजपे आणि डॉ. अश्विनी परांजपे यांनी पु. ल. देशपांडे यांच्या ‘असा मी असा मी’ या नाटकातील विनोदी नाट्यप्रवेश सादर करून प्रेक्षकांना मनमुराद हसवले.

विराज सवाई याने ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. अभिलाष भवार, प्रतीक मेहता, रश्मी पांढरे, छाया ताई यांनी संयोजनात मदत केली. कार्यक्रमाचे नेटके आयोजन विराज सवाई आणि डॉ विनया केसकर यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.