Maval News : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी मावळ भाजपची जोरदार तयारी

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) : भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना आपल्या घरी स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. त्यानिमित्त सोमवारी वडगाव येथील भाजपा कार्यालयामध्ये माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी नियोजन बैठक आयोजित केली. मावळ तालुक्यातील पंचायत समिती गण व जि.प गट निहाय अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन केले गेले.

9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान तालुक्यातील ‘माजी सैनिक हर घर तिरंगा’ या अभियानाच्या संयोजनाबद्दल गुलाबकाका म्हाळसकर यांनी सविस्तर माहिती दिली. त्या दरम्यान कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील माजी सैनिक, कलाकार, खेळाडू, समाजसेवक यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन तिरंगा ध्वज भेट देऊन देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षाचे महत्व विशाद करायचे आहे, असे सांगितले. दिनांक 12 ऑगस्ट रोजी तिरंगी रॅलीचे आयोजन करून संपूर्ण तालुका तिरंगामय करावा, असे आवाहन करून तिरंगा ध्वज उभा करताना तो प्लास्टिक, कागदी, नसावा तसेच ध्वजाचा केशरी भाग वरील बाजूस असावा, अशी माहिती दिली. दि.12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या तिरंगा रॅलीच्या नियोजनाबद्दल मावळ तालुका भाजपा युवा मोर्च्या व विद्यार्थी आघाडीच्या वतीने होणाऱ्या तिरंगा रॅली नियोजनाची तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे यांनी माहिती दिली. प्रास्ताविक विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी केले व यादव सोरटे यांनी आभार मानले.

या वेळी उपस्थितामधे उपसभापती शांताराम कदम, सरचिटणीस सुनील चव्हाण,मच्छिंद्र केदारी,सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे, वडगाव शहर अध्यक्ष अनंताकुडे,प्रदीप हुलावळे,अर्जुन पाठारे,गणेश ठाकर,सुभाष धामणकर,नामदेव वारींगे, रवी आंद्रे,प्रवीण शिंदे,विकास लिंभोरे,विठ्ठल तुर्डे,दिनेश ढोरे,माऊलीआडकर,रविभाऊ शेटे,नितीन कुडे, अक्षय भेगडे,शिवांकुर खैर,सचिन येवले,सागर येवले,सचिन पांगारे, हरिभाऊ दळवी,अक्षय म्हस्के,राजाराम असवले,संतोषअसवले, सचिन कदम, दत्ता पडवळ,बबलु सुर्वे,रमेश बच्चे,संदिप पोटफोडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.