Khadki Crime News : विदेशातून गिफ्ट पाठवल्याचे सांगत महिलेची 30 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावरील ओळख झालेल्या महिलेला गिफ्ट पाठवल्याचे सांगत तिची तब्बल ३० लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. एप्रिल ते ऑक्टोंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. ३७ वर्षीय महिलेने यााप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फेसबुक धारक व बँक खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या भाऊ पाटील रोडवर राहण्यास आहेत. त्यांना एप्रिल महिन्यात एका अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती त्यांनी स्विकारली. त्याने त्याचे नाव डॉ. डोमिनिंक ग्लोबेल असे सांगितले होते. रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर त्यांच्यात बोलणे सुरू झाले. बोलण्यातून त्यांची ओळख निर्माण झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले.

दरम्यान, त्याने तक्रारदार यांना गिफ्ट पाठविले असल्याचे सांगितले. परंतु, हे गिफ्ट दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाने पकडले असून, ते सोडवून घेण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना गे गिफ्ट सोडविण्यासाठी त्यांना अज्ञातांनी सतत फोनकरून वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांच्यांकडून तब्बल २९ लाख ८८ हजार ५०० रुपये भरण्यास भाग पाडले.

पैसे भरल्यानंतरही गिफ्ट मिळाले नाही. तर, आणखी त्यांना पैशांची मागणी करण्यात येत होती. त्यावेळी त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार केली. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता जाधव या करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.