Kuruli Crime : कुरुळी येथे आढळले एक दिवसाचे मृत अर्भक

एमपीसी न्यूज – कुरुळी येथे प्रतीक लॉजजवळ (Kuruli Crime) कच्च्या रस्त्यावर एक पुरुष जातीचे एक दिवसाचे अर्भक आढळून आले. हा प्रकार सोमवारी (दि. 6) सकाळी दहा वाजता उघडकीस आला.

आकाश महादेव अंकुश (वय 38, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News : दारूचे पैसे मागताच कामगाराला बेदम मारहाण  

पोलिसांनी (Kuruli Crime) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश हे सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास कंपनीत कामावर निघाले होते. पायी चालत जात असताना कुरुळी येथे प्रतीक लॉज शेजारी एका निळ्या कॅरीबॅगमध्ये त्यांना संशयित वस्तू आढळली. अंकुश यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी संशयित बॅग तपासली असता त्यात पुरुष जातीचे एक दिवसाचे मृत अर्भक आढळले. अज्ञातांनी अर्भकाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक केली. याबाबत अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.