Kamshet : दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात, एकाचा मृत्यू, दोघे जखमी

एमपीसी न्यूज – दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर, दोघे जखमी झाले आहेत. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत येथे शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला.

श्रीराम मुंगसे (वय 23, रा. रासे, खेड), असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, सागर मुंगसे (वय 26), गणेश मुंगसे (वय 27, दोघे रा. रासे, खेड) जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन (एमएच 14, एफएच 5203)  या बुलेटवरुन तीघे जण जात होते. कामशेत येथून जात असताना दुचाकी दुभाजकाला धडकली. त्यामध्ये श्रीराम याचा जागीच मृत्यू झाला. तर, सागर, गणेश जखमी झाले आहे. त्यांच्यावर कामशेत येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.