Pune : कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणातील आणखी एकजण मुंबईतून पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – कॉसमॉस सायबर हल्लाप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने काल (दि.15) मुंबईमधून आणखी एकाला अटक केली आहे.

अँथोनी ऑगस्टीन(वय 40) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व्हर हॅक करून कॉसमॉस बँकेतून तब्बल 94 कोटी रुपये काढण्यात आले होते. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई, इंदूर, कोल्हापूर येथील एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने तपास करून ही कारवाई करण्यात आली आहे. 24 सप्टेंबरपर्यंत मुबंईतून अटक केलेल्या आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.