Kamlai Dairy Chowk : कमलाई डेरी चौकात एकेरी वाहतूक

एमपीसी न्यूज – विमानतळ वाहतूक विभागाने (Kamlai Dairy Chowk) पोरवाल रोड लोहगाव पुणे येथे कमलाई डेअरी चौकातून धोनारी जकात नाक्याकडे जाणाऱा मार्ग सुमारे 200 मीटर एकेरी करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरूरमध्ये, घेतली ‘या’ माजी आमदाराची भेट

वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी हा बदल करण्यात येणार असून नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून सेवंथ हेवन रोडने व डि. वाय. पाटील कॉलेजकडून येणारी वाहतूक ही कमलाई डेअरी चौकातून डावीकडे वळून साठे वस्तीकडे जाऊन अरूम एलीमेंटो सोसायटी जवळून उजवीकडे वळून 20 फुटी डिपी रोडने ऑर्किड हॉस्पीटलजवळ उजवीकडे वळून पोरवाल रोडने धानोरी जकात नाक्याकडे जाता येईल. नागरिकांनी (Kamlai Dairy Chowk) या बदलाची नोंद घेत बदलानुसार वाहतूक करावी, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त राहूल श्रीरामे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.