Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरूरमध्ये, घेतली ‘या’ माजी आमदाराची भेट

एमपीसी न्यूज : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी रात्री शिरूर येथील रुग्णालयात जाऊन माजी आमदार बाबुराव पाचरणे यांची भेट घेतली. पाचारणे यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली. पाचरणे यांच्या कुटुंबाची ही भेट घेत; ते लवकर बरे होतील अशी सदिच्छा व्यक्त केली.
शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात पाचरणे यांच्यावर उपचार सुरू आहेत. दहा वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे इतर नेते आणि पदाधिकारी यांच्या समवेत पाचरणे यांची भेट घेतली. बाबुराव पाचरणे यांचे पक्षकार्यात व एकूणच समाजकारणात मोठे योगदान आहे. आम्ही कायम पाचरणे कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत; अशा शब्दात फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला.

यावेळी आमदार पाचरणे यांच्या शिरूर (Devendra Fadnavis) येथील संपर्क कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने भाजपचे स्थानिक कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांच्यासमोर बोलताना फडणवीस यांनी पाचरणे हे पुन्हा पूर्वीप्रमाणे बरे होऊन कामाला लागतील आणि शिरूर तालुक्यातील विकास कामासाठी माझ्याकडे आणि चंद्रकांत दादांकडे आग्रह धरतील असा विश्वास व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.