23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Shivajirao Adhalrao Patil : मुख्यमंत्री आमचे, वॉर्डरचना मात्र राष्ट्रवादीच्या फायद्याची; आढळरावांनी व्यक्त केली मनातली खंत

spot_img
spot_img
एमपीसी न्यूज – राज्यात सध्या सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. शिवसेनेचेचं मंत्री आपल्याच नेतृत्वाविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. राज्यात आपलीच सत्ता असतानादेखील आपलीच कशी गळचेपी होते हे सांगताना दिसत आहेत. यात आता भर पडली आणखी एका नावाची. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी आपल्या मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवली आहे. 

 

PCMC Guidelines : नैसर्गिक आपत्ती पासून जीवितहानी टाळण्यासाठी मार्गदर्शक सुचनांचे पालन करा, महापालिकेचे आवाहन

 

एका कार्यक्रमात बोलत असताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, राज्यात आपल्याला आता निवडणुकीला सामोरे जायचं आहे. महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या निवडणुका आहेत. (Shivajirao Adhalrao Patil) राज्यात जरी आमचे मुख्यमंत्री असले तरीही वार्ड रचना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सूटेबल होतील अशा झाल्या आहेत. शिवसेनेचे नुकसान होईल अशा पद्धतीने संपूर्ण पुणे जिल्ह्यात वार्ड रचना करण्यात आल्या. याविषयी बोलायला गेलो तर ऐकले जात नाही. शिवसेनेच्या प्रेमापोटी आम्ही या सगळ्या गोष्टी सहन करत आहोत.

spot_img
Latest news
Related news