Dehu Road : देहूरोड कॅन्टोन्मेंट रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट सुरु, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोकार्पण  

विशेष मुलांच्या नवीन शाळा इमारतीचेही उदघाटन

एमपीसी न्यूज : आदमा इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीच्या सीएसआर निधीतून  देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 166 लिटर प्रती मिनिट क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट  सुरु करण्यात  आला आहे. या प्लांटचे लोकार्पण शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते  मंगळवारी ( दि. 17) करण्यात आले. 

 यावेळी  कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल,  आदमा इंडिया प्रा. लि.चे कार्यकारी  संचालक बालाजी प्रसाद,  जनरल मॅनेजर प्रमोद  सुर्यवंशी,  कॅन्टोन्मेंट  बोर्डासाठी ऑक्सिजन प्लान्ट देण्यासाठी शिफारस करणारे  लष्कर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरिक्षक अशोक कदम,  कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत,  माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, माजी नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांच्यासह  विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

दररोज 120 रुग्णांना पुरेल इतक्या ऑक्सिजनची निर्मिती  

 या प्लॅन्टची  किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे.  या ऑक्सिजन प्लान्टमुळे दररोज 120 रुग्णांना पुरेल इतक्या ऑक्सिजनची निर्मिती  होणार आहे. त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्ड 2012 सालापासून विशेष मुलांकरीता शाळा चालवत आहे. ही  शाळा आतापर्यंत जुन्या इमारतीमध्ये चालवण्यात येत होती. मात्र,  कॅन्टोन्मेंट बोडनि नुकतीच अद्यायावत इमारत उभारली आहे. या इमारतीचे उदघाटनही खासदार बारणे  यांच्या  हस्ते  करण्यात आले.

प्रास्ताविक  मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी केले.  सूत्रसंचालन  निशात शेख यांनी केले. आभार कार्यालयीन अधिक्षक राजन सावंत यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.