Pune News : बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर चाकूचे वार करून लुबाडले

एमपीसी न्यूज : मित्रासोबत बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून तिला लुबाडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या घटनेचा तरुणीचा 26 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला आहे. याप्रकरणी आरिफ शेख (वय 29) यांनी तक्रार दिली असून कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि त्याची मैत्रीण बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर घाट उतरत असताना फिर्यादीची मैत्रीण नैसर्गिक विधी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला गेली होती. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या तिघांनी चाकू सारख्या धारदार हत्यारांनी वार करून या तरुणीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि रोख रक्कम असा 26 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.  कोंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.