Pune News : पूर्ववैमनस्यातून तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न, तिघांना अटक

एमपीसी न्यूज : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने दोघा भावांवर तलवारीने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.  पोलिसांनी तिघांना पकडले आहे. 

आकाश रवी सरोदे (वय 22), सुदर्शन रामु जाधव (वय 19) व अमोल ऊर्फ सागर मल्हारी भिसे (वय 20, सर्व. रा. फुरसुंगी) यांना अटक केली आहे. तर चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात समीर नरळे (वय 22, रा. कावळेवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीसोबत फिर्यादी व त्यांच्या मित्राचे सोमवारी दुपारी भांडण झाले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता.

दरम्यान सायंकाळी फिर्यादी व मित्र विशाल गायकवाड व भाऊ गणेश हे तिघे शेवाळवाडी येथील कॅनॉलचे रोडवरुन जात होते. या टोळक्याने त्यांना अडविले. तसेच शिवीगाळ करत विशाल व गणेश यांच्यावर तलवारीने डोक्यावर, पाठीवर व हातावर वार करुन जबर जखमी केले. तर फरशीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक अडागळे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.