PCMC : नदीत राडारोडा टाकणाऱ्यांवर पर्यावरण विभागाची कारवाई; 2 लाख 61 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण (PCMC)विभागाने वाकड, पिंपळे निलख येथून उचललेला राडारोडा नदी पात्रात टाकणाऱ्यांवर  कारवाई करत 2 लाख 61 हजारांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.

शनि मंदिर रोड, वाकड व पिंपळे निलख या भागांतून दररोज ट्रक,  (PCMC)डंपर, टेम्पो- 407, आर.एम.सी. प्लॅन्टच्या मिक्सर गाड्या अशी वाहने नदीच्या कडेला राडारोडा टाकताना व रस्त्यावर रेडिमिक्स काँक्रीट सांडत होते.

त्यामुळे हवा प्रदूषण होत असल्या बाबतची तक्रार पर्यावरण विभागास प्राप्त झाली होती. त्यानंतर पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करुन सापळा रचून या सर्व वाहनचालकांवर  कारवाई केली.

Pune Lonavala Local : रविवारी पुणे-लोणावळा दरम्यान 14 लोकल रद्द

नदी पात्रात भराव करणारे कासीम शेख,  लक्कवा पुजारी, बसवराज कसबी यांची तीन वाहने पकडून 36 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला. तसेच शनी मंदिर रोड, वाकड रस्त्यावर रेडीमिक्स कॉक्रीट सांडल्याप्रकरणी 9 वाहने पकडून प्रत्येकी 25 हजार रुपये प्रमाणे 2 लाख 25 हजार रुपये दंड आणि एकूण 2 लाख 61 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

नदी, नाल्यांच्या बाजूने राडारोडा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाईचा इशारा पर्यावरण विभागाने दिला आहे.

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=9uFZI7ujChc&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.