PCMC news : सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडे अग्निशमनची जबाबदारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडे अग्मिशमन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (PCMC news) मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभागाचे अतिरिक्त कामकाज  त्यांच्याकडे देण्यात आले. प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी याबाबतचा आदेश पारित केला.

मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे हे नियत वयोमानानुसार 31 ऑक्‍टोबर 2022 रोजी पालिका सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर तत्काळ दुस-या अधिका-याकडे हे पद देणे अपेक्षित होते. मुख्य अग्निशामक अधिकारी या पदावर उप अग्निशामक अधिकाऱ्याला बढती मिळू शकते. (PCMC News) मात्र, महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडे गेल्या कित्येक वर्षांपासून उप अग्निशामक अधिकारी हे पद देखील रिक्त आहे. त्यामुळे पालिका या दोन्ही पदासाठी लवकरच परिक्षा घेणार आहे.  राज्य शासनाकडे मुख्य अग्निशामक अधिकारी देण्याची मागणीही करणार आहे.

International Award : ‘जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

प्रशासकीय कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांच्याकडे अग्निशमन विभागाचे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली.(PCMC News)  पुढील आदेश होईपर्यंत थोरात यांच्याकडे मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभागाचे अतिरिक्त कामकाज सोपविण्यात आले आहे. या पदास असलेले सर्व अधिकार वापरण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. त्यांना ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाबरोबरच अग्निशमनची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.