Pimple gurav News : बचत गटाचे पैसे बँकेत भरण्यासाठी निघालेल्या महिलेची  बॅग पळविली  

एमपीसी न्यूज – महिला बचत गटाचे पैसे बँकेत भरण्यासाठी निघालेल्या महिलेची  बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पळविली. पिंपळे गुरव येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोरून जाणा-या रोडवर सोमवारी (दि.11) ही घटना घडली.

स्मिता जयेश पिल्ले (वय 40, रा. पिंपळे गुरव, सांगवी) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी चोरट्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बचत गटाचे पैसे भरण्यासाठी बँकेत भरण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने महिलेच्या हातातून 11 हजार 280 रूपये असलेली बॅग चोरी करून पळून गेला. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.