PimpleGurav : संस्कृती चुडे सीईटीच्या परीक्षेत पुणे विभागात प्रथम

एमपीसी न्यूज – राज्यात घेण्यात आलेल्या एमएचटी – सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला या परीक्षेत पिंपळे गुरव येथील काटे पुरम परिसरात राहणारी संस्कृती एमएससीईटीमध्ये पुणे विभागातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. पुणे विभागातून प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले आहे. तिला सीईटीमध्ये 99.96 टक्के गुण मिळाले. तिला मेडिकल जाण्याचा मानस आहे.

राज्य सीईटीमध्ये एकूण ३६ जिल्ह्यांतील १२६० परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. याचा निकाल आज जाहीर झाला. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत पुणे विभागातून संस्कृती जुडे ही 99.96 टक्के गुणांसह टॉपर ठरली आहे. संस्कृती मॉडर्न कॉलेजची विद्यार्थिनी आहे.

अभ्यासाबाबत बोलताना संस्कृती चुडे म्हणाली, एचएससी बोर्डाच्या धर्तीवर अभ्यास करत होते. मेडिकलला जायचे असल्याने जास्त अभ्यास केला. पुण्यात पहिली येईन, असे वाटले नव्हते. पण, बोर्डाच्या दृष्टीकोनांतून अभ्यास केला होता. या तिच्या यशामध्ये आई, वडिल यांचा मोठा हिस्सा आहे. आई प्रायमरीमध्ये टिचर आहे तर, वडील इंदिरा कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. पुढे मेडिकलला जाण्याचा मानस असल्याची तिने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.