Pimpri: शहरात आज 913 नवीन रुग्णांची नोंद, 130 जणांना डिस्चार्ज तर 12  मृत्यू

913 new patients registered in the city today, 130 discharged and 12 died : शहरातील रुग्णसंख्या 21 हजार पार झाली असून 21 हजार 193 वर पोहोचली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 876 आणि शहराबाहेरील 37 अशा 913 जणांचे रिपोर्ट आज (शुक्रवारी)  पॉझिटीव्ह आले. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 130 जणांना आज घरी सोडण्यात आले. 

दरम्यान,  शहरातील रुग्णसंख्या 21 हजार पार झाली असून 21 हजार 193 वर पोहोचली.

आज 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  पुनावळेतील 45 वर्षीय  पुरुष, चिंचवडमधील 38 वर्षीय युवक, पिंपरीतील 79, 77 वर्षीय दोन वृद्ध,  भोसरीतील 41 वर्षीय पुरुष,  निगडीतील 70 वर्षीय पुरुष, मोशीतील 65 वर्षीय पुरुष,  दापोडीतील 69 वर्षीय पुरुष, चाकण येथील 42, 44 वर्षीय दोन पुरुष,  खेड येथील 55, 60 वर्षीय असे दोन पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 21 हजार  193 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 12,575 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 335  जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 86 अशा 421 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3527 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 4383

# पॉझिटीव्ह रुग्ण – 913

#निगेटीव्ह रुग्ण – 3464

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण -1369

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3527

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 3887

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -21,193

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3527

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या -421

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -12,575

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 24078

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 79970

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.