Pimpri : समाजकार्यासाठी सरसावले अमृतवेला टिमचे युवक कार्यकर्ते

एमपीसी न्यूज – मतदानाचा टक्का वाढून त्याचा उच्चांक होईल, अशा थाटात घोषणा करीत निवडणूक आयोगाने मतदानाचे नियोजन केले. पण, मतदारयादीतील गोंधळामुळे मतदारांच्या स्लिपऐवजी मोबाईलमध्ये बोट ठेवण्याची वेळ मतदारांवर ओढविली होती त्यात काही तरुण कार्यकर्त्यांनी मतदारांना त्यांचे मतदान केंद्र कुठे आहे. याबाबतीत मदत करुन एक हात मदतीसाठी दिला. यातून या युवकांचे सामाजिक कार्यासाठी असलेली धडपड दिसून येते. समाजकार्यासाठी अमृतवेला टिमचे युवक कार्यकर्ते सरसावले.

मावळ लोकसभा मतदान निवडणुक प्रक्रिया आज पार पडली. काही ठिकाणी मतदारयादीत नावे नसल्यामुळे मतदारांना परत जावे लागले. तर काही ठिकाणी बुथ केंद्रावर अधिकारी असूनही देखील मदत होत नव्हती. त्यातच पिंपरीतील काही युवक तरुण मतदानासाठी जयहिंद कॉलेजमध्ये आले. त्यांनी आलेल्या मतदारांना मदत केली. त्यात पिंपरीतील अमृतवेला पिंपरी टिमच्या काही युवकांनी मदतीचा हात दिला.

  • याबाबतीत अमृतवेला पिंपरी टिमचे मुकेश शेरवानी म्हणाले की, आम्ही मतदान केंद्रात मतदानासाठी सकाळी आलो. त्यावेळी बरीच गडबड गोधळ पिंपरीतील जयहिंद शाळेत दिसला. मतदारांना विचारले असता त्यांना त्यांच्या मतदान स्लिप पोहोचल्या नव्हत्या. कोणाची नावे सापडत नव्हती. अशावेळी या टिममधील युवकांनी आप आपल्या मोबाईलवर त्यांचे स्लिपमधील मतदान केंद्राच्या नावे शोधून दिली. त्याबद्दल मतदारांनी या अमृतवेला टिमचे आभार मानले. या टिममध्ये सातजण असून त्यांनी असेच सामाजिक कार्ये करावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.