Pimpri: आणखी एक रुग्ण ‘कोरोनामुक्त’; 12 पैकी नऊ रुग्ण ठणठणीत

शहरात आता केवळ तीन रुग्ण कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेला आणखी एक रुग्ण ‘कोरोनामुक्त’ झाला आहे. या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटीव्ह आली असून, त्याला आता घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे 12 पैकी नऊ रुग्ण ठणठणीत झाले आहेत. त्यामुळे शहरात आता केवळ तीन रुग्ण कोरोनाबाधित आहेत. मागील दहा दिवसात एकही नवीन कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही.

या रुग्णाची 14 दिवसांचे पहिले रिपोर्ट शनिवारी (दि.28) निगेटीव्ह आले होते. त्यानंतर दुसरे रिपोर्ट देखील आज निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे हा रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळले होते. हे तीन रुग्ण शुक्रवारी (दि.27) ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले. तर, शनिवारी (दि.28) आणखी पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आज रात्री आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसात नऊ रुग्ण कोरोनामुक्त होत घरी गेले आहेत. शहरात आता केवळ तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.