BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महापालिका स्थायी समितीची 87 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील विकासकामांसाठी येणा-या 87 कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता दिली. त्यामध्ये औषध खरेदी, जलनि:सारण, सीमाभिंत बांधणे या कामांचा समावेश आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या 3 आणि 10 जुलै रोजीच्या दोन तहकूब सभा आज (शुक्रवारी) पार पडल्या. सभापती विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. औषधे खरेदी 16 कोटी 49 लाख, मोशी-देहू आळंदी भागात पेव्हींग ब्लॉक व गटर्स करणेकामासाठी 29 लाख 42 हजार, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जनजागृतीसाठी 25 लाख, क्रीडा प्रबोधनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजन पुरविण्यासाठी 18 लाख, भोसरी, इंद्रायणीनगरमधील स्केटींग ट्रकची उर्वरित कामांसाठी 1 कोटी 30 लाख, पिंपळेनिलख लिनिअर गार्डन विकसित करण्यासाठी एक कोटी, क्षेत्रीय कार्यालय कचरा उचलण्यासाठी 25 लाख, माध्यमिक शिक्षणाविभागाअंतर्गत घड्याळी तासिकेवर शिक्षक नेमणुकीसाठी 74 लाख रुपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

  • वैद्यकीय विभागातील फर्निचर खरेदीसाठी 62 लाख, क्रीडा शिष्यवृत्ती 6 लाख, पदकप्राप्त खेळाडूंसाठी 4 लाख, कासारवाडी येथील रेल्वेलाईनच्या कडेने नाले विकसित करण्यासाठी तीन कोटी, मलनि:सारणसाठी साडेतीन पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे नुतनीकरण करण्यासाठी 66 लाख, तळवडेतील रस्त्यासाठी 41 लाख, सीमाभिंत दुरुस्तीसाठी 41 लाख, त्रिवेणीनगर चौक ते तळवडे रस्त्याचे फुटपाथ व डांबरीकरणासाठी पाच कोटी, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी 72 लाख, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना पादत्राणे व सॉक्स व पी.टी.शुजसाठी 10 कोटी 50 लाख रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी वाघेरे गावातील भैरवनाथ मंदीर येथे बहुउद्देशीय ईमारत बांधण्यासाठी पाच कोटी 81 लाख, जाधववाडीतील दिवाबत्तीसाठी एक कोटी, डीपीरस्ताला प्रकाश व्यवस्था करण्यासाठी एक कोटी, मोशीतील विद्युतकामांसाठी दोन कोटी, प्रभाग क्रमांक 19 मधील आरक्षणे विकसित करण्यासाठी 82 लाख, कामी संजय काळे मैदान विकसित करण्यासाठी 73 लाख 85 हजार, 71 झोपडपट्टया मधील शौचालयाची दुरूस्ती व डागडुजीसाठी 41 लाख 74 हजार, झोपडपट्टयांमध्ये उर्वरित ठिकाणी मलनि:सारण व्यवस्थेसाठी 45 लाख, कासारवाडी मैला शुध्दीकरण केद्राअंतर्गत ड्रेनेज लाईन व चेबरची देखभाल, दुरूस्तीसाठी 29 लाख 96 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

  • चिंचवड मैला शुध्दीकरण केद्राअंतर्गत मोरवाडी परिसरात जलनि:सरण नलिका टाकणे व जलनि:सरण विषयक सुधारणा कामांसाठी 30 लाख, विजयनगर, पवनानगर, नढेनगर, कोकणेनगर, राजवाडेनगर व ईतर परिसरातील जलनि:सरण विषयक सुधारणा कामांसाठी 59 लाख 67 हजार, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर व पावसाळी साधणांसाठी दोन कोटी 55 लाख आणि जाधववाडीतील ताब्यात आलेल्या जागेस सिमाभिंत बांधण्यासाठी सहा कोटी एक लाख 30 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
HB_POST_END_FTR-A2

.