Pimpri: भोसरी, गवळीनगर, दिघी प्रभाग ठरतोय शहरातील कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’, सर्वाधिक 12 रुग्ण

'ब' आणि 'ड' प्रभागात अद्यापपर्यंत कोरोनामुक्त, क्षेत्रीय कार्यालयनिहाय नकाशा प्रसिद्ध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात कोरोनाचे किती रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा पीसीएमसी स्मार्ट सारथी पेजवर प्रसिद्ध केला आहे. भोसरी, गवळीनगर, दिघी हा भाग येत असलेल्या ‘इ’ प्रभाग कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. सर्वाधिक 12 रुग्ण या प्रभागात आहेत. तर, ‘ब’ आणि ‘ड’ प्रभागात अद्यापपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय रुग्ण संख्या

‘अ‘ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर,   मोहननगर, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात (कोरोनाचा एक पॉझिटीव्ह रुग्ण आहे)

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत,  बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड, काळेवाडी भागात (कोरोनाचा एकही रुग्ण नाही).

‘क’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी), धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात (कोरोनाचे 8 रुग्ण आहेत)

‘ड’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात (कोरोनाचा एकही रुग्ण नाही).

‘इ‘ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनग, चऱ्होली, दिघी भागात (कोरोनाचे सर्वाधिक 12 रुग्ण आहेत.)

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली,  कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर,  यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या भागात (कोरोनाचे दोन रुग्ण आहेत).

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात (कोरोनाचे चार रुग्ण आहेत).

‘ह’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, कासारवाडी, दापोडी,फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात (कोरोनाचे चार रुग्ण आहेत).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.