Pimpri : पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी; पाच जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 16) पहाटे दीडच्या सुमारास बौद्धनगर पिंपरी येथे घडली. या प्रकरणात दोन्ही गटांनी परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले.

अमोल बबन घोडके (वय 30) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार किशोर तुरुकमारे, सुभाष तुरुकमारे, पंडित तुरुकमारे, आनंद तुरुकमारे, सनी सोनवणे, राकेश साळवे, आकाश राजपूत, सनी सरवदे यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सर्वजण आरोपी मिळून पहाटे दीडच्या सुमारास अमोल यांच्या भावाला मारहाण करीत होते. त्यामुळे ती भांडणे सोडवण्यास अमोल गेले. आरोपींनी अमोल यांच्यावर देखील जीवघेणा हल्ला करत कोयत्याने वार केले. यामध्ये अमोल यांच्या हाताला डोक्याला व त्यांच्या भावाला डोक्याला आणि पाठीला गंभीर इजा झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच्या परस्पर विरोधात सुभाष बाजीराव तुरुकमारे (वय 28) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आकाश बबन घोडके, बंटी भूमकर, सागर प्रभाकर शिंदे, प्रमोद दत्तात्रय साबळे, ऋषिकेश गीताराम तुरुकमारे, लखन उर्फ अमोल बबन घोडके व इतर तीन जण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आकाश याने सुभाष यांच्या समोर येऊन बिअरच्या बाटल्या फोडल्या. याबाबत सुभाष यांनी विचारणा केली असता ‘तू काय भाई आहेस का, तू मला विचारणार कोण’ असे म्हणत आकाशने सुभाष यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच अन्य आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये सुभाष त्यांचा भाऊ आणि मित्र असे तिघे जण गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.