Pimpri Chinchwad Burglary : पिंपरी, चिंचवड, हिंजवडीत घरफोडी; दागिने, रोकड लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी, चिंचवड आणि हिंजवडीत (Pimpri Chinchwad Burglary) घरफोडी झाली. या तीनही घरफोडीत सोन्या, चांदीचे 5 लाख 70 हजार रुपयांचे दागिने, 3 लाख 70 हजारांची रोकड, 95 हजार असे 10 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे.

चिंचवड येथील घरफोडी प्रकरणी विवेक विष्णुपंत मुद्देबिहाळकर (वय 59, रा. केशवनगर, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शनिवारी मुद्देबिहाळकर हे सिंहगड येथील भावाच्या घरी गेले होते. शनिवारी मध्यरात्री चोरटे घराचा कडी-कोयंडा उचकडून घरात घुसले. चोरांनी डरुममधील 16.05 तोळे सोन्याचे दागिने, 2.05 किलो चांदीची भांडी, देवाचे चांदीचे दागीने असा 5 लाख 70 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune Crime News : गांज्याची विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक;22 किलो गांजा जप्त

हिंजवडी, मारुंजीतील घरफोडी (Pimpri Chinchwad Burglary) प्रकरणी अतुल आसाराम रहाणे (वय 42) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रहाणे हे शुक्रवारी कुटुंबियांसह आत्याच्या मुलीच्या विवाहासाठी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीला गेले होते. चोरट्यांनी घराच्या गॅलरीचे फ्रेंच डोअर उचकटून गॅलरीत शिडी लावून घरात प्रवेश केला. लाकडी कपाट चावीच्या सहाय्याने उघडले. त्यांनी कपाटातील ड्रावरमध्ये ठेवलेली 3 लाख 70 हजार रुपयांची रोकड लांबविली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

पिंपरीतील घरफोडी प्रकरणी मुकेश पुनमचंद राजावत (वय 29, रा. नेहरुनगर) यांनी फिर्याद दिली. 13 मे रोजी मुकेश यांचे घर बंद होते. चोरटे कुलुप तोडून घरात घुसले. घरातील कपाटाच्या लॉकरमधील 75 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 20 हजार रुपयांची रोकड असा एकूण 95 हजार रुपयांचा माल चोरुन नेला. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.