Pimpri Corona Update : रविवारी शहरात 12 नवीन रुग्ण; 9 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 15) दिवसभरात12 नवीन रुग्ण आढळले, तर 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोना बाधितांची आजवरची संख्या 3 लाख 59 हजार 630 एवढी झाली आहे. तर आजवर 3 लाख 55 हजार 654 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात 83 रुग्ण सक्रिय आहेत. या सर्व रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 19 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 848 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 35 लाख 87 हजार 659 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.