Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 14 आरोपींना अटक करत सात पिस्टल व 10 जिवंत काडतुसे केली जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad) सध्या अॅक्टीव मोडवर असून मोक्काच्या कारवाईनंतर गुरुवारी (दि.2) पाच वेगवेगळ्या कारवाईमध्ये सात पिस्टल 10 जिवंत काडतुसे, कोयता, तलवार असे घातक शस्त्र जप्त केले आहेत. पोलिसांनी सध्या ट्विटर, व्हॉटसअपद्वारे नागरिकांनाही पोलिसांना सहकार्य कऱण्याचे आवाहन केले आहे. याच कारवाईचा भाग म्हणून पोलिसांनी 14 आरोपींना अटक करत त्यांच्याकडून सुमारे 8 लाख 32 हजार 311 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी वाकड, हिंजवडी, आळंदी, महाळुंगे, सांगवी या पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई केली आहे.

SSC Exam : दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट मिळणार 6 फेब्रुवारीपासून!

आळंदी येथे गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये ज्ञानेश्वर बाळासाहेब पारवे (वय 22, रा.केळगाव), सिद्धेश सिताराम गोवेकर (वय 28, रा.वडमुखवाडी), यश शिवाजी भोसले (वय 22, रा.आंळदी) अशी अटक आरोपींची नावे असून पोलिसांनी यांच्याकडून 2 लाख 1 हजार 100 रुपयांची एक लोखंडी पिस्टल (मॅगझीनसह), एक जिवंत काडतुस , कोयता अशी शस्त्रे जप्त केली आहेत.

महाळुंगे पोलिसांनी केलेल्या कारवाईत अजिंक्य कैलास जाधव (वय 23, रा.निगडी) याला अटक केले असून एक पिस्तूल, एक जिवंत काडतुस एसा एकूण 23 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.

वाकड पोलीस ठाणे अंतर्गत गुंडा विरोधी पथक व अमंली पदार्थ विरोधी पथकाने दोन कारवाई केल्या असून यात गुंडा विरोधी पथकाने आदर्श उर्फ आदऱ्या दत्ता (वय 22, रा.रहाटणी), सुमित शैलेंद्र गाडे (वय 21, रा. पिंपळे सौदागर), गणेश सुनिल गुटाळ (वय 24, रा.रहाटणी), अशोक आनंदराव पटेल (वय 22, रा.खेड) यांना अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी 1 लाख 1 हजार 900 रुपयांचा 2 पिस्टल, 3 जिवंत काडतुस, 1 तलवार, 2 कोयते अशी शस्त्रे व कार असा एकूण 5 लाख रुपायांचा ऐवज जप्त केला आहे.

वाकड येथे अंमली पदार्श विरोधी (Pimpri Chinchwad) पथकाने निलेश भगवान तारू (वय 32 रा.काळेवाडी), अक्षय प्रकाश मानकर (वय 22 रा.उत्तमनगर, पुणे), वैभव सुरेश मानकर (वय 30 रा. शिवणे),यांना पोलिसांनी अटक केली आहे तर हितेश सुरेश मानकर (रा.शिवणे) हा फरार झाला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 लाख 11 हजार रुपयांचा कोयता, देशी बनावटीचे पिस्टल मॅगेझीनसह, दुचाकी, मोबाईल असा एवज जप्त करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी साईकिरण मोहन गोरे (वय 19 रा.हिंजवडी) याला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 20 हजार रुपयांचा गावठी कट्टा व व दोन जिवंत काडतुस असा एकूण 20 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला.

सांगवी पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी एक गावठी कट्टा व एक जिवंत काडसुत असा एकूण 11 हजार 100 रुपायांचा एवज ज्पत केला आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हाती घेतलेल्या या मोहिमेत त्यांनी गुन्हेगारांचे रेकॉर्ड अद्यावत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मोक्का कारवाई व धाडसत्र यांना वेग आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.