Pimpri: विद्युतपुरवठा खंडित; शहरातील पाणीपुरवठा आज, उद्या विस्कळीत

pimpri-chinchwad Power outage; City water supply disrupted today, tomorrow

एमपीसी न्यूज- रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राचा विद्युत पुरवठा मंगळवारी आणि आज (दि.3) खंडित झाल्यामुळे पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील आज सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तसेच आज सायंकाळचा आणि उद्या गुरुवारी सकाळचाही पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 येथे पाणी शुद्ध करुन शहरवासियांना पुरवठा केला जातो.

रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्राचा मंगळवारी आणि आज विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे त्या कालावधीत पाण्याचा उपसा झाला नाही. परिणामी, पिंपरी-चिंचवड शहरातील आजचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.

तसेच आज संध्याकाळचा आणि उद्या सकाळचाही पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.