Chinchwad Crime News : सहा घटनांमध्ये चार दुचाकींसह सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – निगडी, पिंपरी, भोसरी, चिंचवड, एमआयडीसी भोसरी, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या सहा घटना घडल्या. यामध्ये दोन लाख 48 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

निगडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यात एका व्यक्तीची सोन्याची चेन एका अनोळखी चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली, तर पिंपरी येथे एक घरफोडी झाली असून त्यामध्ये अज्ञात चोरटयांनी घरातून 22 हजारांचे साडेसात ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.

लांडगे वस्ती, भोसरी येथून 40 हजारांची दुचाकी अज्ञात चोरटयांनी चोरून नेली. चिंचवड येथे चाफेकर चौकातून 50 हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी एका विद्यार्थ्याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आदर्शनगर, मोशी येथून एका तरुणाची 55 हजारांची दुचाकी राहत्या घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी तरुणाने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घराच्या पार्किंग मधून दुचाकी चोरून नेण्याचा प्रकार वाकड येथे देखील घडला आहे. चोरट्यांनी 15 हजारांची दुचाकी चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.