Pimpri corona update: पिंपरी-चिंचवड शहरात नवीन 749 रुग्ण; एकूण संख्या 70 हजार 172

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात आज (रविवारी) 749 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 70 हजार 172 झाली आहे. दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1 हजार 151 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या 5 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रविवारी 1 हजार 151 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 59 हजार 968 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज महापालिका हद्दीतील 8 आणि हद्दीबाहेरील 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण चिखली (पुरुष 64 वर्षे, पुरुष 70 वर्षे), पिंपरी (स्त्री 84 वर्षे), निगडी (पुरुष 43 वर्षे), काळेवाडी (स्त्री 75 वर्षे), चिंचवड (पुरुष 79 वर्षे), भोसरी (पुरुष 78 वर्षे), पिंपळे निलख (पुरुष 69 वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे विश्रांतवाडी (पुरुष 50 वर्षे), धनकवडी (पुरुष 71 वर्षे), जुन्नर (स्त्री 50 वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील एकाही रुग्णांचे आज शहरात निदान झाले नाही. सध्या 1 हजार 159 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 365 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 476 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.