Pimpri Corona Update : शहरात अवघे 1235 सक्रिय रुग्ण; 241 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज, 185 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 185 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 241 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, शहरात सध्या 1 हजार 235 सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील 3 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 312 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 61 हजार 54 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 235 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 223 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 12 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 54 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 454 आहेत. आज दिवसभरात 3 हजार 632 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 7 लाख 92 हजार 899 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.