Pimpri Corona Update : शहरात आज 242 नवीन रुग्णांची नोंद, 173 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 242 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 173 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 रुग्णाचा आज मृत्यू झाला. मागील 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 274 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 56 हजार 697 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 306 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 374 रुग्ण गृहविलगीकरणात असून 932 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 37 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 414 आहेत. आज दिवसभरात 16 हजार 31 जणांचे लसीकरण झाले. तर, आजपर्यंत 6 लाख 11 हजार 441 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.