Pimpri Crime News : कला दिग्दर्शक राजू सापते यांची राहत्या घरी आत्महत्या

एमपीसी न्यूज – मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रात कला दिग्दर्शक म्हणून काम करणारे राजू सापते यांनी पिंपरी चिंचवडमधील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. राकेश मोरीया हा इसम आपल्याला विनाकारण त्रास देत असून, काम करु देत नाही. म्हणून या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे सापते यांनी आपल्या व्हिडीओत म्हटले आहे.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (शनिवारी) सकाळी हा प्रकार घडला.

आत्महत्या करण्यापूर्वी राजू सापते यांनी व्हिडीओद्वारे आपली कैफियत मांडली. सापते म्हणाले ‘मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. राकेश मोरीया मला खूप त्रास देत आहेत. माझं कोणत्याही प्रकारचे पेमेंट थकीत नाही. राकेश मोरीया लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून वदवून घेत आहेत की राजू सापतेनी ‘एक का देड दिया नही’.

मी सगळं पेमेंट क्लिअर केलं आहे. तरीही राकेश मोरीया मला खूप त्रास देत आहे. कोणतंही काम सुरू करु देत नाहीत, सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत.

मला ‘झी’च काम सोडून द्यावं लागलं, तसेच दक्षमी क्रिएशन्सचे काम सुरू असताना त्यांनी ते बंद पाडले. त्यामुळे या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे. तरी मला न्याय मिळावा.’ असे राजू सापते यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी राजू सापते यांच्या आत्महत्येची पुष्टी झाल्याचे ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

प्रोड्युसर असोसिएशनचा वचक नाही असा आरोप राजू सापते यांनी आपल्या व्हिडीओतून केला आहे. यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील युनियनच्या दादागिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.