Pimpri Crime News : कर्जाचे ठरलेल्या व्याजापेक्षा अधिक पैसे घेऊन व्यावसायिकाला मारहाण, पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – व्यावसायिकाने ओळखीच्या इसमाकडून 25 टक्के व्याजदराने 20 दिवसांसाठी 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज वेळेत परत करु न शकल्याने संबंधित इसमाने व्यावसायिकाकडून व्याजासह मुद्दल व वेळोवेळी जबरदस्तीने पैसे उकळले तसेच त्यांना मारहाण केली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान शगुन चौक, पिंपरी याठिकाणी हा प्रकार उघडकीस आला.

विकास किर (रा. काळेवाडी), सचिन सौदे, विजय सौदे (रा. काळेवाडी), विकी भोरे (रा. रिव्हर रोड, पिंपरी), खुपचंद मंगताणी (रा. वैभव नगर, पिंपरी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी करण मनोज तुलसानी (वय 20, रा. साई चौक, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण तुलसानी हे होजिअरी व्यावसायिक आहेत. त्यांनी विकास किर याच्याकडून 25 टक्के व्याजदराने 20 दिवसांसाठी 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले.

कर्ज वेळेत परत करु न शकल्याने आरोपीने 40 दिवसांचे 80 हजार रुपये वसूल केले तसेच फिर्यादीला शगुन चौक येथे बोलवून धमकी देत मारहाण केली.  50 हजार रुपायांच्या बदल्यात व्याजासह 65 हजार रुपये घेतले आणि वेळोवेळी दुकानात येऊन कधी एक हजार तर कधी दोन हजार रुपये घेतले असे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.