Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम सागर लोटला

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील भीमसृष्टीचा सजलेला परिसर, जयभीमचा जयघोष, थोर महामानवास अभिवादन करण्यासाठी जमलेला अथांग जनसागर आणि पुतळ्यावर (Pimpri) हेलिकॅप्टरमधून होत असलेली पुष्पवृष्टी अशा अनोख्या संगमाने आज सकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात सुरुवात झाली. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम सागर लोटला आहे.

महानगरपालिकेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील तसेच पिंपरी चौक आणि एच.ए.कॉलनी येथील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासन शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Talegaon Dabhade : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे नव्या पिढीचा उद्धार शक्य – डाॅ संभाजी मलघे 

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, मुख्य संयोजक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, उप आयुक्त रविकिरण घोडके, मनोज लोणकर, माजी नगरसदस्य ॲड.सचिन भोसले, अनंत को-हाळे, मारुती भापकर, सद्गुरू कदम, विशेष अधिकारी किरण गायकवाड, (Pimpri) क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, उप अभियंता ल्क्ष्मीकांत कोल्हे, चंद्रकांत कुंभार, एच.ए.कंपनी येथील रमेश जाधव, सुरेंद्र  पासलकर, मारूती बोरावके, मिलींद जाधव, सुनिल रिकामे, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.