Khed : पैशांची मागणी करत व्यावसायिकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – नऊ लाख रुपयांची मागणी करत (Khed) तिघांनी मिळून एका व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे घडली.

संभाजी शिवाजी खेडकर (वय 34, रा . साबळेवाडी, ता. खेड. मूळ रा. अहमदनगर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बबलू खताडे, शंकर पवार आणि विष्णू भास्कर (सर्व रा. जालना) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम सागर लोटला

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पैशांच्या कारणावरून चिडून फिर्यादीकडे नऊ लाख रुपयांची मागणी केली. तसेच फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने त्यांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.(Khed) यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.