Pimpri :डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये शरीर रचनाशास्त्र विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

एमपीसी न्यूज – पिंपरी मधील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे सोसायटी ऑफ क्लिनिकल ॲनाटोमिस्ट्स (SOCA-2024)च्या 12 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला आज (गुरुवारी, दि. 4 एप्रिल) सुरुवात झाली. परिषदेत 500 पेक्षा अधिक संशोधक, डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. 4 ते 6 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या परिषदेत शरीररचना शास्त्र आणि इतर संबंधित विषयातील देश विदेशातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

या आंतरराष्ट्रीय परिषदेची थीम ‘जर्नी ऑफ ऍनाटॉमी टू डिसेक्शन हॉल टू ऑपरेशन थिएटर’ अशी ठेवण्यात आली आहे. कारण पूर्वी अवयव प्रत्यारोपण हा शिक्षणाचा भाग होता. मात्र संशोधन आणि संसाधनांच्या अभावामुळे त्याची रुग्णालयांमध्ये अंमलबजावणी व्यापक प्रमाणात होत नव्हती. आता शिक्षण आणि संशोधन व्यापक झाल्याने अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आधुनिक पद्धतीने होत आहेत. डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर (Pimpri) मध्ये अवयव प्रत्यारोपण सन 2006 मध्ये सुरु झाले. आजवर 350 पेक्षा अधिक अवयव प्रत्यारोपण करून संस्थेने देशभर लौकिक मिळवला आहे.

Pune : विद्या अभिषेकी यांचे निधन

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुलपती डॉ. पी. डी. पाटील उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील, विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील यांनी या परिषदेच्या आयोजनात महत्वाची भूमिका घेतली आहे. अवयव प्रत्यारोपणाचे शारीरिक आणि सर्जिकल पैलू, पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, शरीरशास्त्रातील 3D प्रिंटिंग, मेंदू इमेजिंग यांसारख्या विषयांवर परिषदेत चर्चा होणार आहे.

डॉ. यशराज पाटील म्हणाले,सोसायटी ऑफ क्लिनिकल ॲनाटोमिस्ट्स SOCA-2024 च्या संशोधनात ही परिषद (Pimpri) मैलाचा दगड ठरेल. वैद्यकीय संशोधन, शस्त्रक्रिया नवकल्पना, शैक्षणिक पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्र आल्याने वैद्यकीय क्षेत्रात नवीन क्रांती आली आहे.”

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर म्हणाले, “ही परिषद म्हणजे नाविन्यपूर्ण विचारांची देवाणघेवाण करण्याचा संगम आहे. केवळ अभ्यास करणे हा याचा उद्देश नाही तर शरीररचनाशास्त्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी ही परिषद काम करेल.”

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या शैक्षणिक संचालक (Pimpri) डॉ. पी वत्सलास्वामी म्हणाल्या, “शरीररचना शास्त्र समजून घेणे हा वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे. तरच पुढील अडचणी जाणून त्यावर उपाय करता येणार आहे. त्यामुळे शरीररचनाशास्त्र विभागाने इतर विभागांच्या सोबत मिळून नवीन क्षितीज गाठण्याचा या परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. अवयवदान आणि देहदान याबाबत देखील सखोल चर्चा होणार आहे. परिषदेत सात महत्वाची व्याख्याने होणार आहेत. संशोधन, माहिती आणि नाविन्य यावर आधारित विविध विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.