Pimpri : अतिक्रमण कारवाई दरम्यान पालिका अधिकारी, पोलिसांना धक्काबुक्की; महिलांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – अतिक्रमण कारवाई करण्यासाठी (Pimpri) गेलेल्या महापालिकेच्या पथकाला कारवाई करण्यासाठी विरोध केला. महापालिका अधिकारी आणि पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर काम करणाऱ्या महिलेने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi News : सायबर क्राईमबाबत सजगतेची गरज – डॉ. दीपक शिकारपूर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (Pimpri) पथक शगुन चौक, पिंपरी येथे अतिक्रमण कारवाई करण्यासाठी गेले. गुरुवारी दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास कारवाई करत असताना आरोपी महिलांनी अतिक्रमण विरोधी कारवाई करत असलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांनाही हुज्जत घातली. पोलिसांना धक्काबुक्की केली. कारवाई करू नये यासाठी दुकाने बंद करण्यास सांगून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.