Pimpri: दर गुरुवारी आणि रविवारी स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’चे पालन करावे : महापौर

Every Thursday and Sunday, people should voluntarily observe the 'Janta curfew': Mayor :

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, त्याने आलेले हे अभूतपूर्व संकट पाहता कोरोना विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी दर गुरुवारी व रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत स्वत:हून जनता कर्फ्यू पाळावा. या वेळेत विनाकारण घराबाहेर पडू नये असे, आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

गेल्या चार महिन्यापासून महापालिकेतील व शहरातील डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातले कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महापालिका प्रशासन, सर्व लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था कोरोना विरोधात लढा देत आहेत. तसेच कोरोना हद्दपार करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेतच.

पण हा लढा यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थाने यामध्ये नागरिकांचा उत्स्पुर्त सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे.

यासाठी कोरोना प्रसाराचे संपूर्ण जनतेपुढे आलेले हे गंभीर संकट दुर करण्यासाठी व त्याला आळा घालणेसाठी शहरातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी या जनता कर्फ्यू’मध्ये स्वत:हून सहभाग घेणे हे अत्यंत गरजेचे आहे.

त्यासाठी शहरातील सर्व कारखानदार, खाजगी अस्थापना, घाऊक व किरकोळ मालाचे व्यापारी, दुकानदार, भाजी विक्रेते, भाजी मंडई चालक, मटन, मांस विक्रेते यांनी खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी दर गुरुवारी व रविवारी आपली दुकाने, अस्थापना पूर्णवेळ बंद ठेऊन महापालिकेस सहकार्य करावे.

तसेच शहरातील नागरिकांनी दर गुरुवारी व रविवारी अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे ; अन्यथा संपूर्ण दिवसभर घरीच रहावे.

तसेच स्वत:ची काळजी घ्यावी व इतरांचीही घ्यावी, असे आवाहनही महापौर व सत्तारुढ पक्षनेते यांनी शहरातील जनतेला केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.