Pimpri: सत्कार सोहळ्याला गर्दी जमविण्यासाठी भाजपने महिलांना वाटले पैसे!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपवर कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी महिलांना पैसे वाटण्याची वेळ आली. प्रदेशाध्यक्ष आणि माजी पालकमंत्र्यांच्या सत्काराला पैसे देऊन गर्दी जमविल्याचा प्रकार समोर आला. कार्यक्रम संपल्यानंतर भाजप कार्यकर्ता प्रत्येकी महिलेला 500 रूपये वाटप करत असताना दिसून आले.

केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानिमित्त रावसाहेब दानवे, पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येत संसदेत गेले आहेत. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे आज (सोमवारी) दोघांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

  • त्याचबरोबर शहर भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयाचे त्यांचे हस्ते ई-उद्‌घाटन करण्यात आले. पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष येणार म्हटल्यावर कार्यक्रमाला गर्दी तर जमवावीच लागणार होती. कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी पैसे देऊन महिला आणण्याचे प्रकार उघडकीस आला.

  • कार्यक्रम संपल्यानंतर महिलांना 500 रुपये वाटताना भाजप कार्यकर्त्याला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिले. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दिसताच भाजप पदाधिकारी गोंधळून गेले. बोलविलेल्या महिलांना नाष्ट्यासाठी पैसे दिल्याची सारवासारव त्याने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.