Pimpri: नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोरवाडीत रविवारी आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – कै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त उद्या (रविवारी) रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती ऑल इंडिया धनगर महासंघाचे शहराचे अध्यक्ष दीपक भोजने यांनी दिली.

मोरवाडीतील रॉक गार्डनमधील नाना-नानी पार्क हॉलमध्ये रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीच या वेळेत हे शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये महिला आणि पुरुषांची सामान्य तपासणी, डोळे, बालकदंत तपासणी मोफत केली जाणार आहे. या शिबिराचा जास्त-जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आरंभ सोशल फाऊंडेशन, स्वराज ग्रुप म्हाडा, विघ्नहर्ता प्रतिष्ठान मोरवाडी, मैत्री बौध्द विहार, ओंकार मित्र मंडळ, मनित मित्र मंडळ म्हाडा सोसायटी, म्हाडा मोरवाडी मित्र परिवार, पीसीसीए ग्रुप आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने संयोजनात पुढाकार घेतला आहे.

नाव नोंदणीसाठी दीपक भोजने 7387407825, रेणुका भोजने 9307552061, गजानन पाटील 9604717678, विजय भोजने 9922501768 आणि नंदकुमार काळे 8459990745 यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.