Pimpri : ‘बस डे’ निमित्त महापौर यांचा बसने प्रवास

एमपीसी न्यूज – प्रवाशांच्या सोयीसाठी खास ‘बस डे’ विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या निम्मित महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी सांगवी गाव बसस्थानक ते अप्पा बळवंत चौक पर्येंत बसने प्रवास केला.

पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत आज (दि १० ) रोजी पुणे व पिंपरी चिंचवड मधील प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष मोहिमे अंतर्गत ‘बस डे’ साजरा करण्यात आला.

या निम्मित महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगवी गाव बस स्थानक ते अप्पा बळवंत चौक पर्येंत बसने प्रवास केला. यानिम्मित आज २७५ ज्यादा बसेस मार्गिकेवर सोडण्यात आल्या होत्या. तसेच पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी एकूण 475 बसेस सोडण्यात आल्या होत्या. आज शेड्युल केलेल्या सर्व बसेस टक्के मार्गस्थ झाल्याची माहिती परिवहन महामंडळामार्फत देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.