Pimpri : महापालिका तळमजल्यावरच पाणी देणार, पहिल्या मजल्यावर नाही

एमपीसी न्यूज – शहरातील सोसायट्यांच्या तळमजल्यावरील (Pimpri)साठवण टाकीमध्ये पाणीपुरवठा करणे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. तळमजल्यावरच पाणी दिले जाईल, पहिल्या मजल्यावर नाही.

ज्यांच्याकडे साठवण टाक्यांची व्यवस्था नाही, त्यांनी इमारतीच्या तळमजल्यावर व वरील मजल्यावर साठवण टाकी बांधून घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांतर्फे चोरीला गेलेला 2 कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना वापस

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना / नळजोड ग्राहकांना पाणीपुरवठा (Pimpri)केला जातो. पाणीपुरवठा हा पुरेसा दाबाने ग्राहकांचे तळमजल्यावरील साठवण टाकीमध्ये (UGWT, बांधकाम केलेली किंवा सिन्टेक्स / प्लास्टिक टाकी) करणे महापालिकेचे कर्तव्य आहे. वरील मजल्यावर किंवा किचन मध्ये नाही.

नागरिकांनी तळमजल्यावरील असलेल्या टाकीवर इलेक्ट्रिकल मोटर / पंप लावून इमारतीवर बांधलेल्या / ठेवलेल्या साठवण टाकीवर (OHWT) पाणी पंपिंग करुन साठवणे बंधनकारक आहे.

इमारतीवरील (OHWT) टाकीतून इमारतीस पाईप मधून पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे साठवण टाक्यांची व्यवस्था नाही त्यांनी इमारतीच्या तळमजल्यावर व वरील मजल्यावर साठवण टाकी बांधून घ्यावी, साठवण टाकीची सोय करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. इमारतीच्या कोणत्याही मजल्यावर पाणीपुरवठा करणे ही पिंपरी-चिंचवड महापालिकेची जबाबदारी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.