Pimpri : शहराला स्वच्छ करण्यासाठी पालिकेचा ‘पोस्ट अ वेस्ट’ उपक्रम

परिसरातील कच-याबाबत नागरिकांना करता येणार तक्रार

एमपीसी न्यूज – शहरातील वेगवेगळ्या प्रकारचा कचरा साफ करण्याबाबत (Pimpri) महापालिकेने ‘पोस्ट अ वेस्ट’ हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांना आपल्या परिसरातील वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्याचा फोटो काढून पालिकेच्या संकेतस्थळावर अथवा सारथी मोबाईल ॲपवर पोस्ट करता येईल. त्याची संबंधितांकडून तत्काळ दखल घेतली जाईल. तसेच पालिकेने केलेल्या कारवाईचा फोटो देखील तक्रारदारांना पाहता येईल. यामुळे शहराला अधिकाधिक स्वच्छ बनवण्याचा पालिकेचा मानस आहे.

शहरात कोठेही झाडांच्या फांद्या तोडून ठेवल्या असतील, काढलेले गवत इत्यादी हिरवा कचरा, बांधकामाचा राडारोडा, हॉटेल, खानावळ, मंगल कार्यालय येथील शिल्लक अन्न, खरकटे तसेच इलेक्ट्रॉनिक कचरा अश्या वेगवेगळ्या प्रकारातील कचरा उचलणे व त्याबाबत तक्रारी करण्यासाठी ऑनलाईन स्मार्ट सारथी ॲपमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

PMPML : पीएमपीएमएलच्या मेट्रो फिडर बससेवेला उत्तम प्रतिसाद, सप्टेंबर महिन्यात कमावले 26 लाखांचे उत्पन्न

पालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in किंवा मनपाचे सारथी मोबाईल ॲपद्वारे नागरिक तक्रार करू शकतील. नागरिकांनी केलेली तक्रार ही महापालिकेने नेमून दिलेल्या एजन्सीकडे नोंद होऊन त्वरित निपटारा करण्यासंबंधी कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी सदर तक्रारी मधील असुविधेचा फोटो या ॲप्लीकेशनमध्ये अपलोड करून आपली तक्रार नोंदवायची आहे. या तक्रारीचा क्रमांक नागरिकांना त्वरित ऑनलाईन पद्धतीने दिला जाईल.

संबधित एजन्सीने तक्रारीचा निपटारा करून ऑनलाइन पद्धतीने त्याची नोंद घ्यायची आहे. यामुळे नागरिकांना तक्रार निवारण केल्याची त्वरित माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच त्या जागेचा फोटो ॲप्लीकेशन मध्ये अपलोड केला जाईल. याद्वारे नागरिकांना तक्रार करतानाची स्थिती व तक्रारीचा निपटारा झाल्यानंतरची स्थिती फोटोच्या माध्यमातून पाहण्यास व तपासण्यास मागणी नुसार उपलब्ध राहील. तक्रारीचा ठराविक वेळेमध्ये निपटारा न झाल्यास आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग यांच्याकडून संबंधित एजन्सीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

या स्मार्ट सारथी ॲपमध्ये निर्माण करून दिलेल्या सुविधेमुळे नागरिकांच्यातक्रारी कमी होऊन वेळेत निपटारा होण्यास मदत होणार आहे. आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, उद्यान विभाग यांच्याकडून माहिती घेऊन ॲप्लीकेशन तयार करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली तक्रार नोंदवावी. परिसरातील कचऱ्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी याचा वापर करावा असे आवाहन पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले (Pimpri) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.