Pimpri News : अतिक्रमण कारवाई दरम्यान आढळली बॉम्बसदृश वस्तू

एमपीसी न्यूज – पिंपरीमध्ये आज (सोमवारी, दि. 9) सकाळी अतिक्रमण काढताना बॉम्ब सदृश वस्तू आढळली आहे. पिंपरी भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या क्रोमा शोरूम जवळ ही वस्तू आढळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी मधील क्रोमा शोरूम जवळ कोहिनुर टॉवर ही सोसायटी आहे. सोसायटी जवळ मोकळी जागा असून तिथे अतिक्रमण झाले होते. सोमवारी सकाळी अतिक्रमण काढण्यात आले. त्यावेळी बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली.

सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी त्यांच्या ओळखीतील जाणकारांना व्हिडीओ कॉलवरून माहिती दिली. त्यावेळी जाणकारांनी ही वास्तू ब्रिटिशकालीन बॉम्ब असून त्याच्या जवळ न जाण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पिंपरी पोलीस तसेच बॉम्ब शोधक नाशक पथकही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यानंतर जेसीबीच्या बकेटमध्ये वाळूची पोती टाकून त्यात बॉम्ब सदृश वस्तू ठेऊन पुढील तपासणीसाठी नेण्यात आली आहे.

यापूर्वी देखील अशा प्रकारचे ब्रिटिशकालीन बॉम्ब पिंपरी परिसरात सापडले आहेत. हे बॉम्ब अनेक वर्षांपासून जमिनीवर पडलेले असून ते खोदकामाच्या वेळी उघडकीस येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.