Pimpri News : क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे समाधीजवळ रंगले क्रांती कवी संमेलन

एमपीसी न्यूज – ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या वाकडेवाडी येथील स्मृतिसमाधीजवळ शब्दधन काव्यमंचाच्या वतीने कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. रविवारी (दि.08) हा कार्यक्रम पार पडला.

ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) अध्यक्ष शोभा जोशी, उद्योजिका ऊर्मिला पाटील, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, सचिव रामदास साळवे, सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोगदंड, शब्दधन काव्य मंचचे संस्थापक सुरेश कंक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामराव सरकाळे यांनी केले. सुभाष चव्हाण यांनी ‘क्रांतिकारकाचा आत्मयज्ञ’ या व्याख्यानातून लहुजी वस्ताद साळवे यांचा जीवनपट उलगडला. त्यानंतर क्रांती कविसंमेलनात सुरेश कंक, आय.के.शेख, निशिकांत गुमास्ते, तानाजी एकोंडे, कैलास भैरट, फुलवती जगताप, शरद शेजवळ, आत्माराम हारे, अरुण कांबळे, सुभाष शहा, राजू जाधव या कवींनी देशभक्तिपर आणि सामाजिक आशयाच्या कवितांचे सादरीकरण केले.

‘क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या तालमीत अनेक क्रांतिकारक घडविले. मनगटाच्या ताकदीमधूनच क्रांती घडू शकते, याची जाणीव नव्या पिढीने ठेवावी’, असे विचार नंदकुमार मुरडे यांनी मांडले.

पंकज पाटील, अशोक गोरे, संगीता जोगदंड, दीपक वायाळ, सचिन लोखंडे, दादा ससाणे, उमेश शिंदे यांनी कार्यक्रमाच्या संयोजन केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.