Pimpri News : पोलिसांनी केला 14 वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा, चव्हाण गँगच्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या  युनीट एक यांनी 14 वर्षांपूर्वीच्या (Pimpri News) खुनाचा उलगडा केला असून यामध्ये पोलिसांनी चव्हाण गँगच्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

आप्पा गोमाजी मोहिते (वय 50 रा.भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्याची मैत्रिण ही त्याच्या अनैतिक संबधामध्ये आडवी येत असल्या कारणाने त्याने मैत्रिणीला पिंपरीतील के.एस.बी. चौक येथून अपहरण केले. पुढे त्याने तिला स्वतःच्या घरात कोंडून ठेवले. याप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्याने पुढे त्या मैत्रिणीचा निर्घृण खून केला. त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावून तो नाव बदलून राजगुरुनगर जवळील वाकी या खेडेगावात राहत होता.  चाकण एमआयडीसी परिसरात मिळेल ती मजुरी करत होता.

दरम्यान, पोलीस चव्हाण गँगचा सक्रिय सदस्य प्रकाश चव्हाण असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी यासाठी 15 वर्षांपूर्वीचे सहआरोपी व प्रकाश चव्हाण यांचा तपास सुरु केला. यावेळी आरोपी आप्पा गोमाजी मोहिते हा परिसरात नाव बदलून राहत असल्य़ाची व तो लवकरच औरंगाबाद येथे जाणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. मात्र पोलिसांकडे त्याचा 15 वर्षापूर्वीचा फोटो असल्याने चाकण एमआयडीसी परिसरात शोधणे कठीण झाले होते.

त्यामुळे पोलिसांनी वाकी परिसरात सापळा रचून रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता संबंधीत तरुणी ही पत्नी कडून घटस्फोट घे व माझ्याशी लग्न कर नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी देत होती. त्यामुळे तिचा खून केला असल्याचे कबूल केले.

Bhosari News : गो-आधारित अर्थव्यवस्थेसाठी संशोधन सुरु; डॉ. विजय भटकर यांची माहिती

ही कारवाई गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ (Pimpri News) पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस नाईक महाडीक, पोलीस नाईक  सचिन मारे, पोलीस शिपाई गर्जे, महाले , पोलीस हवालदार कमले व तांत्रिक तपास पोलीस हवालदार माळी यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.