Pimpri News: कोरोनाचा वाढता प्रसार! नागरिकांना आजपासून महापालिकेत ‘नो एंट्री’!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांना आज (मंगळवार) पासून महापालिकेत ‘नो-एंट्री’ असणार आहे. या प्रवेशबंधीचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे. विभागप्रमुखांनी नागरिकांसोबत व्हिसीद्वारे संवाद साधून समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली. 1 जानेवारीपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. विषाणूचा वेगाने फैलाव होत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय, नियमशासकीय आणि महापालिका कार्यालयातील नागरिक, अभ्यांगतांच्या प्रवेशांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात महापालिकेशी संबंधित कामकाजासाठी येणारे सर्व नागरिक, अभ्यांगत यांनी जास्तीत-जास्त ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करण्याकरिता सर्व संबंधित विभागप्रमिुखांनी सूचना द्याव्यात.

विभागप्रमुखांनी नागरिकांसोबत व्हिसीद्वारे संवाद साधून समस्यांचे निराकरण करावे. अपरिहार्य परिस्थितीत कार्यालयात येणे आवश्यक असल्यास संबंधित विभागातील अधिका-यांची स्पष्ट व लेखी पूर्वपरवानगी घेऊनच दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेमध्येच कार्यालयात येण्यासाठी अपवादात्मकरित्या प्रवेश द्यावयाचा आहे. तसेच सर्वसामान्ययपणे काही अपवादात्मक परिस्थितीत, अतितातडीची बाब म्हणून कार्यालयात येणे आवश्यक असणा-या सर्व नागरिक, अभ्यांगत, ठेकेदार यांनी लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण केल्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.