pimpri News : पूर्णानगर, शाहूनगर, संभाजीनगर,महात्मा फुलेनगर, शिवतेज नगर परिसरात वारंवार वीज गायब; एकनाथ पवार यांचा आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – ऐन उन्हाळ्यात पूर्णानगर, संभाजीनगर, शाहूनगर, शिवतेज नगर, महात्मा फुले नगर परिसरात वारंवार वीज जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणच्या या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करीत पिंपरी – चिंचवड महापालिकेचे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी थेट महावितरण कार्यालयावर आंदोलनाचा इशारा सोमवारी (दि. 25) दिला आहे.

सततच्या भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात वातावरणातील उकाडा वाढला आहे. उकाड्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच त्रस्त झाले आहेत. तसेच, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. अशा परिस्थितीत वारंवार होत असलेल्या भारनियमनामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. रात्री-अपरात्री अचानक वीज गायब होत असल्याने नागरिकांना रात्रीची झोप मिळणेही कठीण झाले आहे.

वीज पुरवठा खंडित होत असल्याबाबत विचारणा करण्यासाठी नागरिक महावितरण कार्यालयात संपर्क साधत आहेत. मात्र, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दाद देत नसल्याचे चित्र आहे. ते उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. या प्रकारामुळे संतप्त झालेले माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी थरमॅक्स चौकातील महावितरणच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.