Pimpri News : एच ए कंपनी मैदान आणि चिखली मधून गोळा केला तब्बल 20 टन कचरा

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका व महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्मीधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता. अलिबाग, जि. रायगड यांच्या वतीने हिंदुस्तान अँटिबायोटिक कंपनीच्या मैदान, मासुळकर कॉलनी परिसरात मंगळवारी (दि. 1) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात 20 टन कचरा जमा करण्यात आला.

आज राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सुमारे वीस टन कचरा संकलित करण्यात आला. महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्मीधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एच ए कंपनी मैदान परिसर पिंपरी व स्पाईन रोड चिखली प्राधिकरण येथे स्वच्छता अभियान घेण्यात आले.

क प्रभागाच्या परिसरात आयोजित या स्वच्छता अभियानामध्ये आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. के अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे, गणेश देशपांडे पिंपरी-चिंचवड व चाकण परिसरातील एक हजार स्वयंसेवकानी सहभाग घेतला.

एच ए कंपनी मैदानच्या 14 हजार चौरस मीटर परिसर व बाजूच्या परिसरात सुमारे 20 टन सुका कचरा गोळा करण्यात आला. यावेळी प्रशासन अधिकारी मुकेश कोलप मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवाल, शैलेश वाघमारे, विक्रम सौदाई व कर्मचारी सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.