Chakan Talegaon Road News : रस्ता क्रॉस करताना ट्रेलरच्या धडकेत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता क्रॉस करताना कार ट्रेलरच्या धडकेत 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.28) चाकण तळेगाव रोड, खालुंब्रे येथे सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला.

द्रोपदा भगवान राऊत (वय 40 ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी मयत महिलेचा पती भगवान ग्यानबा राऊत (वय 50, रा. तुळवे वस्ती, खालुंब्रे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रेलर चालक वाजीद रहमान खान (वय 44, रा. हरियाणा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत द्रोपदा या कंपनीत कामावर जाण्यासाठी चाकण तळेगाव रोड, तुळवे वस्ती याठिकाणी रस्ता क्रॉस करत होत्या. यावेली भरधाव आलेल्या ट्रेलरने (एनएल 01 / एएफ /2552) दिलेल्या धडकेत द्रोपदा यांचा मृत्यू झाला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.