Pimpri News: शिष्यवृत्ती प्रशिक्षणाला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिका समग्र शिक्षा कार्यालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या एक दिवसीय शिष्यवृत्ती प्रशिक्षणाला मोठा प्रतिसाद मिळाला.

महापालिकेच्या चिंचवड स्टेशन येथील महात्मा ज्योतिबा फुले शाळेत नुकत्याच झालेल्या प्रशिक्षणाचे उद्‌घाटन महापालिकेच्या प्राथमिक विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, उपायुक्त संदीप खोत यांच्या हस्ते झाले. पर्यवेक्षक अनिता जोशी, रजिया खान, केंद्र समन्वयक शुभांगी साकोरे, विषयतज्ञ उपक्रम सुजाता गायकवाड आदी उपस्थित होते.

प्रशिक्षणात शिष्यवृत्ती संदर्भात मंगला आहेर यांनी गणित व बुध्दिमत्ता, निलेश जगताप यांनी मराठी, दिपक रेटवडे यांनी इंग्रजी विषयावर मार्गदर्शन केले. या सर्व मार्गदर्शकांचे अतिशय मोलाचे योगदान कार्यशाळेसाठी मिळाले. यामध्ये 158 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. प्रदिप शिंदे,  राजेंद्र मोहिते, विषयतज्ञ गजेंद्र थोरात, संतोष जाधव, विशेष शिक्षक जयश्री वाढे, सोनम सोळुंके यांनी नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.